ब्राझील: पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रणाचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी संशोधन

रिओ दि जनेरिओ : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याविषयक संशोधन करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे, असे प्रतिपादन ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री अलेक्झांड्रे सिलवीरा यांनी सांगितले की मिनास गेराइसमधील कार्यक्रमात बोलताना सिलवीरा म्हणाले की, जैवइंधन मिश्रणाची संभाव्य वाढ पारदर्शक असली पाहिजे. ब्राझील सध्या पेट्रोलमध्ये २७ % इथेनॉल मिसळतो. सरकारला प्रथम पेट्रोलमध्ये परवानगी असलेल्या इथेनॉल सामग्रीची मर्यादा वाढवावी लागेल. ती सध्या १८ % ते २७.५ % पर्यंत आहे, परंतु सिलीवेरा म्हणाले की याविषयाचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेली टीम अत्यंत जबाबदारीने काम करेल.

ब्राझील हा जगातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादकांपैकी एक आहे. देशातील बहुतांश कार ऊस किंवा मक्क्यापासून बनवलेल्या १०० % जैवइंधनावर धावू शकतात. याआधी उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांनी रॉयटर्सला सांगितले की, शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या हायब्रीड कारचे उत्पादन आणि विक्री करण्याची ब्राझीलची क्षमता ही ऑटो उद्योगासाठी एक मोठी संपत्ती आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्था हवामान बदलाचा सामना करण्यासाठी डीकार्बोनायझेशनवर भर देत आहे. सिलीवेरा म्हणाले की, इथेनॉलच्या मिश्रणाची मात्रा वाढवल्याने पेट्रोलची आयात कमी करून आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेमध्ये निःसंशयपणे योगदान मिळू शकते. ब्राझील जितके पेट्रोल वापरतो, तितके उत्पादन करत नाही. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here