हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
साओ पाऊलो (ब्राझील) : चीनी मंडी
ब्राझीलच्या साखर उद्योगाला अमेरिकेमध्ये करमुक्त साखर निर्यात करायची आहे. त्यासाठी ब्राझीलकडून अमेरिकेला आयात करमुक्त साखर व्यवहारासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती ब्राझीलमधील एका बड्या साखर कंपनीकडून देण्यात आली आहे.
कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर अमेरिकेने ब्राझीलच्या साखरेला करमुक्त केले नाही तर, अमेरिकेचे इथेनॉल ब्राझीलमध्ये करमुक्त आहे त्यावर कर लागू केला जाईल. सध्याचा करार मोडून त्यावर २० टक्के आयात शुल्क लागू केले जाण्याचा इशारा ब्राझीलकडून देण्यात आला आहे.
ब्राझीलकडून सध्या अमेरिकेच्या इथेनॉलला आयातशुल्क लावण्यात आलेले नाही. अमेरिकेकडून ६ हजार लाख लिटर इथेनॉल ब्राझीलमध्ये आयात केले जाते. या कोट्यापर्यंत इथेनॉलला आयातशुल्क नाही. पण, त्याच्यापुढे २० टक्के आयातशुल्क लागू केले जाते आहे. येत्या ऑगस्टमध्ये हा करार संपणार आहे. त्यानंतर संपूर्ण इथेनॉल आयातीवरच २० टक्के आयात शुल्क लावण्याचा ब्राझीलचा इरादा आहे.
तुलनेत अमेरिकेमध्ये ब्राझीलच्या इथेनॉलवर केवळ २.५ टक्केच आयातशुल्क आहे. यापूर्वी प्रति बॅरल ०.५४ डॉलरचे जाता आयात शुल्क २०११मध्येच रद्द करण्यात आले होते. ब्राझीलचा सध्याच्या आयात शुल्क मुक्त इथेनॉल कोटा हा अमेरिकेला निर्यात करण्यात येणाऱ्या साखरेच्या सहा पट अधिक आहे. त्यामुळे हा कोटा समान असला पाहिजे, असे ब्राझीलच्या साखर उद्योगातील जाणकारांचे मत आहे.
अमेरिका सध्या ब्राझीलला साखरेवर आयात शुल्क माफ करत आहे. पण, त्याचे प्रमाण ब्राझीलच्या साखर उत्पादन आणि निर्यातीच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. पुढच्या आठवड्यात ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनॅरो अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. वॉशिंग्टन येथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार संबंधांवरच चर्चा होणार आहे. ब्राझील सरकारला देशातील साखर उद्योगाच्या स्थितीची जाणीव आहे. त्यामुळे साखर उद्योगाच्या या बैठकीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
ब्राझीलमधीलच नव्हे तर, जगातील साखर उद्योगाची स्थिती सुधारत आहेत. साखरेला चांगला दर मिळू लागला आहे. अतिरिक्त पुरवठ्याकडून साखरेच्या तुटवड्याकडे बाजारपेठ जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. परिणामी साखर उद्योगातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp