ब्राझीलच्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या बँकांनी साखर उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर उद्योगाच्या स्थितीमुळे ब्राझीलमधील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. बहुतांश साखर कारखान्यांना त्यांची बिले भागवण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बँकांनी कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नाक मुरडले आहे.
ब्राझीलमधील एनव्हेस्टमेंट बँक इटाऊ बीबीएचे कृषी व्यापार विभागाचे पेद्रो फर्नांडिस यांच्या म्हणण्यानुसार देशातील साखर पट्ट्यातील सुमारे १८ साखर आणि इथेनॉल कंपन्या त्यांचे कामकाज चालावे इतके पैसेही उभारू शकलेले नाहीत. देशातील मध्य आणि दक्षिण प्रांतातील जवळपास ७५ साखर कारखान्यांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या कारखान्यांची क्षमता ५६० दशलक्ष टन ऊस गाळप करण्याची क्षमता असताना त्यांना यावर्षी केवळ ४७५ दशलक्ष टन गाळप करता आले आहे. या विभागातील केवळ ३५ कंपन्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये लागणारे बदल करून घेतल्यानंतर त्यांच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असून मिळकतही चांगली आहे.
याबाबत फर्नांडिस म्हणाले, ‘मार्केटमधील परिस्थिती मुळे अनेक साखर कारखाने उसामध्ये गुंतवणूक करण्यास असमर्थ झाले आहेत. कारखाने चांगले भांडवल घेऊन गंतुवणूक करण्यास पुढे येत नसल्याचे दिसत आहे. मार्केटमधील परिस्थिती मुळे अनेक साखर कारखाने उसामध्ये गुंतवणूक करण्यास असमर्थ झाले आहेत. कारखाने चांगले भांडवल घेऊन गंतुवणूक करण्यास पुढे येत नसल्याचे दिसत आहे. जगातील साखरेचा भाव गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. पुरवठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. ’
साओ पावलो येथील राबोबँकेचे व्यवस्थापक मान्योल दी क्यूरोझ म्हणाले, ‘उसाच्या गाळपाबाबत आम्हाला एकत्रिकरण दिसू लागले आहे. देशात ७० हून अधिक कारखाने बंद पडले आहेत. उर्वरित कारखान्यांपैकी १२ दशलक्ष टन गाळप करणारे कारखाने जेमतेम सहा दशलक्ष गाळप करत आहेत. ज्या समूहांकडे पाच ते सहा कारखाने आहेत. त्यांच्यातील एखाद दुसऱ्या कारखान्यातच गाळप सुरू आहे. ’ब्राझीलमध्ये २०१८ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. यावर्षीही लागवड कमी झाल्यामुळे पुढचे वर्षही असेच जाण्याची शक्यता आहे. ऊस शेतीचा विस्तार तुम्हाला दिसणार आहे. येत्या काही काळात ऊस उत्पादन १०० दशलक्ष टनाने खाली येईल, असा अंदाज क्यूरोझ यांनी व्यक्त केला.
एफजी/ए या कन्सल्टन्सी एजन्सीचे अॅनालिस्ट विल्यम हेर्नांडेस यांनी सांगितले की, ब्राझीलमधील कारखान्यांकडून भांडवलावरील परतावा खूपच कमी मिळत आहे. त्यामुळे विस्तारसाठी म्हणून गुंतवणूक आणणे कठीण झाले आहे. गुंवतणूक केलेल्या पैशांवर मिळणारा परतावा त्या गुंतवणुकीच्या कितीतरी कमी आहे. त्यामुळे अनेकांना आपले पैसे गमवावे लागत आहेत, अशी माहिती बीटीजी पॅक्टुअल बँकेचे गुंतवणूक तज्ज्ञ थिएगो दौरते यांनी दिली.