न्यूयॉर्क : जगातील साखरेचा प्रमुख निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलमध्ये खाद्य की इंधन अशा दोन मुद्यांवर सुरू असलेल्या चढाओढीमुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचा कमी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ब्राझीलची नजर आता इथेनॉलच्या उच्चांकी दरावर आहेत. कारण, ग्राहकांकडून कोविड १९चे निर्बंध काही प्रमाणात कमी झाल्याने लोक बाहेर पडू लागले आहेत. परिणामी जैव इंधनाचा खप वाढला आहे. त्यामुळे ब्राझीलमधील साखर कारखाने साखरेऐवजी इथेनॉलसाठी उसाची प्रक्रिया सुरू करू शकतील.
पॅरागॉन ग्लोबल मार्केट्सचे मु्ख्य संचालक मायकल मॅकडॉगल यांनी सांगितले की, जे साखर कारखाने आर्थिक अडचणीतून जात आहेत, त्यांच्यासाठी जैव इंधन अधिक लाभदायी आहे. साओ पाऊलो येथील कारखान्यांमध्ये इथेनॉलच्या दरात गेल्या आठवड्यात १० टक्क्यांची वाढ होऊन ते २००० च्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या.
ब्राझीलमध्ये दुष्काळसदृश्य स्थितीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. युनीका उद्योग समुहाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या सहामाहीत केन क्रशिंग ३१ टक्के घटले. न्यूयॉर्कमधील वायदा दरात गेल्या १२ महिन्यांत ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यात अमेरिकेत इथेनॉलच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. ब्राझीलमध्ये गॅसोलीनच्या तुलनेत इथेनॉल महागले आहे. त्याचा अर्थ मागणीत वाढ होऊ शकते. ब्राझीलमधील वाहनचालक दोन्ही इंधनाचा वापर करतात. जे स्वस्त असेल त्याचा वापर केला जातो.