साओ पाउलो : हवमान तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी सांगितले की, ब्राझीलच्या ऊस, कॉफी आणि मक्का क्षेत्रात शीत लहर आली असून देशातील रिओ ग्रांडे डो सूलच्या दक्षिणी राज्य साओ पाऊलोच्या उत्तर भागात कमी तापमान दिसून आले आहे. ग्रामीण क्लिमाचे हवामान विभागाचे तज्ज्ञ मार्को एंटोनियो डॉस सेंटॉस यांनी सांगितले की अशा प्रकारची शीत लहर खूप दिवसांनी दिसली आहे. शीत लहर आल्याने परानातील कॉफीच्या शेतांना फटका बसेल. साऊ पाऊलो देशातील ६० टक्के साखरेचे उत्पादन करते. थंडीच्या या कडाक्याने ऊस पिकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोमरच्या हवामान विभागाचे सेल्सो ओलिवेरा यांनी सांगितले की साखरेच्या क्षेत्रासाठी हवामानाचा प्रभाव अधिक गंभीर आहे. अधिक थंडी असल्याने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य नाही असे तज्ज्ञांनी सांगितले. मक्क्याचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. थंड हवामानामुळे ऊसाच्या तोडणीत गती येईल. साखर कारखाने तोटा कमी करण्यासाठी लवकर गाळप करण्यास सुरुवात करतील. थंडीमुळे ऊसाची वाढ खुंटते आणि साखरेचे त्यातील प्रमाण कमी होते. त्यामुळे कारखान्यांसमोर लवकर तोडणी करण्याचा पर्याय शिल्लक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link