ब्रासिलिया : जगातील मुख्य साखर उत्पादक देश ब्राझीलमधील कारखान्यांच्या गाळप हंगामास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यातील साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३५ टक्क्यांनी कमी असल्याची माहिती ब्राझिलमधील युनिका उद्योग समुहाने दिली आहे.
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ब्राझिलच्या दक्षिण विभागातील साखर उत्पादन ६,२४,००० टन झाले. गेल्यावर्षी याच कालावधीत येथे ९,७१,००० टन उत्पादन झाले होते. उसाचे गाळपही १५.६ मिलियन टन झाले आहे. २०२०च्या तुलनेत हे गाळप ३० टक्क्यांनी कमी आहे. याच कालावधीत इथेनॉल उत्पादन २५ टक्क्यांनी घटून ७३१ मिलियन लिटर झाले आहे. मात्र, यामध्ये १११ मिलियन लीटर मक्क्यावर आधारित इंधनाचाही समावेश आहे.
दक्षिण विभागात एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात गेल्यावर्षी १८० साखर कारखाने सुरू होते. तर यावर्षी १४१ कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका उसाच्या वाढीला बसला आहे असे युनिकातर्फे सांगण्यात आले. युनिकाचे तांत्रिक विभागाचे संचालक एंटोनियो डी पडूआ रॉड्रिक्स यांनी सांगितले की औद्योगिक उत्पादनांची स्थिती योग्य नाही.