साओ पाउलो : ब्राझिलच्या मध्य-दक्षिण (सीएस) विभागात ऑगस्टच्या दुसऱ्या सहामाहीत साखरेचे ३.१३ मिलियन टन उत्पादन झाले आहे, असे Unica उद्योग समुहाने मंगळवारी आपल्या अहवालात म्हटले आहे. हे उत्पादन एक वर्षापूर्वीच्या, समान कालावधीच्या तुलनेत ५.७७ टक्के जास्त आहे. कारखान्यांनी या कालावधीत ४४.०२ मिलियन टन उसाचे गाळप केले आहे. हे गाळप गेल्यावर्षीच्या तुलनेत १.७९ टक्क्यांनी अधिक आहे. आणि साखर तयार करण्यासाठी गेल्या हंगामातील ४८.४ टक्क्यांच्या तुलनेत ४६.४ टक्के या प्रमाणात अधिक ऊस कोटा देण्यात आला आहे. परिणामी इथेनॉल उत्पादन १.२३ टक्क्यांनी घसरुन २.२५ बिलियन लिटर झाले आहे.
ब्राझीलमध्ये साखर कारखाने इथेनॉलच्या तुलनेत अधिक साखर उत्पादनाकडे वळत आहेत. कारण देशात इंधन, खास करुन पेट्रोलवरील करात कपात करण्यात आल्याने जैव इंधनाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे.