ब्राझीलने व्यक्त केली साखर उत्पादनात घट येण्याचे शक्यता

साओ पाउलो : दुष्काळाच्या प्रभावामुळे ब्राझील सरकारने मध्य आणि दक्षिण विभागात चालू हंगामात साखर उत्पादनाच्या आपल्या अंदाजात जवळपास १० टक्क्यांची घट येण्याची शक्यता दर्शवत ३०.७ मिलियन टन उत्पादनाचे अनुमान वर्तविले आहे.

यासंदर्भात रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या कृषी सांख्यिकी एजन्सी असलेल्या कोनाबच्या एका अहवालात म्हटले आहे की, मध्य आणि दक्षिण क्षेत्रात ऊस पिक ५२० मिलियन टन असण्याचे अनुमान आहे. ऑगस्टमधील ५३९ मिलियन टनाच्या अंदाजापेक्षा हे कमी आहे. या क्षेत्रात उसावर आधारित इथेनॉल उत्पादन ऑगस्टमध्ये अनुमान व्यक्त केलेल्या २३.७ बिलियन लिटरच्या तुलनेत २३.१ बिलियन लिटर होण्याची शक्यता आहे.

खराब हवामानामुळे ऊस उत्पादनाच्या होणाऱ्या नुकसानीसह सोयाबीन आणि मक्का अशा फायदेशीर पिकांमुळे उसाचे क्षेत्र घटत असल्याचा दावा ब्राझील सरकारने केला आहे. कोनाबने सांगितले की, ब्राझीलमध्ये ऊस क्षेत्र २०२१-२२ या हंगामात ४.१ टक्क्यांनी घटून ८.२ मिलियन हेक्टर झाले आहे. साखर उद्योगात चांगला दर मिळत असूनही ऊस क्षेत्र घटत असल्याचे कोनाबने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here