श्रीलंकेतील साखर उद्योगाला ब्राझील करणार मदत

कोलंबो : फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ विकोसा, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ कार्लोस आणि ब्राझीलीयन सहयोग एजन्सी (एबीसी) च्या आठ व्यावसायिकांची एक उच्चस्तरीय टीम श्रीलंकेतील डेअरी आणि साखर उद्योगांना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी ९ ते २१ जून २०२३ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा करणार आहे. डेअरी आणि ऊस उद्योग विभागाशी संलग्न समस्यांची ओळख पटवणे आणि श्रीलंकेमध्ये दोन्ही उद्योगांची क्षमता आणि उत्पादन वाढविण्यासाठी तांत्रिक मदत देण्यासाठी हे तंत्रज्ञांचे पथक उडावलावे, कँडी, मवनेला आणि कुरुनगला आदीमध्ये फील्डमध्ये तसेच इतरत्र पाहणी दौरा करेल.

या योजनेला अंतिम रुप देण्यासाठी ब्राझीलमध्ये श्रीलंकेतेचे राजदूत सुमित दासनायके यांनी नेल्सी पेरेस कॅक्सेटा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत श्रीलंकेतील अन्य क्षेत्रामध्ये ब्राझिलच्या तांत्रिक सहाय्याच्या विस्तारावर चर्चा करण्यात आली. ब्राझील सहयोग एजन्सी (एबीसी) चे वरिष्ठ अधिकारी आणि ब्राझीलमधील श्रीलंकेच्या दुतावासाचे प्रथम सचिव (वाणिज्य) चाथुरिका परेरा हे बैठकीत सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here