नैरोबी : चीनी मंडी
केनियातील दरासा इनव्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीने ब्राझीलमधून आयात केलेली ४० हजार टन साखर खराब असल्याने परत पाठवण्यात आली आहे. केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्डच्या निकषांमध्ये साखरेचा दर्जा बसत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. केनियातील मोंबासा बंदरावरून ही साखर ब्राझीलला माघारी पाठवण्यात आली.
केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्डचे आयुक्त केन्नीथ ओखोलो यांनी साखर ब्राझीलला परत पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या निर्णयापूर्वी केआरए आणि साखर आयातदार कंपनी यांच्यात समझोत्याचा करार झाला होता. त्यानंतर साखर खुली करण्यापूर्वी आयातदार कंपनीला थकीत कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरासा कंपनीला २५० कोटी केनियन शिलिंग आणि व्हॅटची थकबाकी भरायची होती. मात्र कंपनीने ९० दिवसांत ५५ कोटी रुपये कर भरण्याची तयारी दर्शवली होती. पण, हा समझोता पुढे गेला नाही.
न्यायालयात केनिया सरकार आणि दरासा कंपनी यांच्यात ब्राझीलच्या आयात साखरेवरून मोठा खटला चालला. करमुक्त साखर आयात करण्याला सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली नाही. मुळात हायकोर्टाने ही साखर करमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. पण, जेव्हा मोंबासा कोर्टामध्ये केआरएकडून याचिका दाखल करण्यात आली, तेव्हा तेथील कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला.
हायकोर्टाने ही साखर करमुक्त करण्याचा आणि केआरएने लावलेला कर बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. पण, मोंबासा कोर्टातील निर्णय दरासा कंपनीच्या विरोधात गेला आणि त्यांना साखर परत पाठवावी लागली. मोंबासा बंदर छोटे असल्याने ब्राझीलची साखर दुबई मार्गे आणण्यात आली होती. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर साखर मोंबासा बंदरात आली नव्हती. दराचा कंपनीने मात्र केआरएचा कर लावण्याचा निर्णय अकारण आणि तर्कहीन होता, असे म्हटले आहे.