साओ पाउलो : ब्राझीलमधील साखर आणि इथेनॉल उत्पादनातील एक मोठी कंपनी साओ मार्टिन्हो यांनी सांगितले की, २०२१-२२ या हंगामात त्यांच्याकडून ऊसावर आधारित जैव इंधनाचे अधिक आणि साखरेचे उत्पादन कमी करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
साओ मार्टिन्होने सांगितले की, तेलाचे वाढते दर आणि ब्राझीलमधील इंधन विक्रीतील सुधारणांमुळे गेल्या हंगामात ५३ टक्क्यांच्या तुलनेत ५८ टक्के ऊसाचा उपयोग इथेनॉल उत्पादनात करण्यात येईल.
कंपनीने सांगितले की, आम्हाला वाटते इथेनॉलच्या चांगल्या दरामुळे यंदा पिकाचा दर चालू हंगामात उच्च स्तरावर राहील. मार्च महिन्यात समाप्त झालेल्या पिकाच्या वर्षात साओ मार्टिन्होने ९२७.१ मिलियन रेईसचा (१८५ मिलियन डॉलर) निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ४५ टक्के अधिक नफा मिळाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे साखरेच्या वधारलेल्या किमती आहेत.
ऊसाच्या वाढीच्या कालावधीत हवामान नेहमीपेक्षा अधिक कोरडे असल्याने ब्राझीलमध्ये या हंगामात उसाचे पिक खराब होण्याची शक्यता आहे.
साओ मार्टिन्होने सांगितले की, चालू हंगामात नऊ टक्के कमी ऊस गाळप होईल अशी अपेक्षा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link