कोरोना महामारीमुळे इथेनॉल ची मागणी खूप कमी झाली आहे, यामुळे ब्राझील अडचणीत आले आहे. तरीही याशिवाय ब्राजील ची एक कंपनी CJ Selecta ने इथेनॉल प्लांट लावण्याचा निर्णय घेतला.
कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइलहर्मी तन्क्रेदी यांनी सांगितले की, CJ Selecta यांनी आपाल्या उत्पादनात विविधता आणण्यासाठी आणि स्थिरतेला मजबूत करण्यासाठी संयंत्रांची निर्मिती करत आहेत.
तानक्रेदी यांनी इथेनॉल बाजार मधील शक्यतांबदल बोलताना सांगितले की, ही एक दिर्घकालीन योजना आहे. मागणी कमी झाली तरी प्लांटची निर्मिती होईलच.
कोरोना महामारी पासून बचाव आणि त्याचा प्रसार थांबवणे तसेच यामुळे होणाऱ्या नुकसाानीतून वर येण्यासाठी ब्राझील मध्ये इथेनॉल च्या डिस्ट्रीब्यूटर्स आणि प्रोड्यूरर्स यांनी स्पेशल क्राइसेस मैनेजमेंट टीम (संकट प्रबंधन टीम) गठीत केली आहे. या महामारीमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महामारी मधील नुकसानापासून वाचण्यासाठी रणनिती बनवणे आणि ती कार्यान्वीत करण्याचे काम या टीमचे आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.