नवी दिल्ली : चीनी मंडी
जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश अशी ओळख असलेल्या ब्राझीलची साखर निर्यात यंदा तब्बल २८.६ टक्क्यांनी घसरणार आहे. आगामी २०१८-१९च्या साखर हंगामात ब्राझीलमधून २२ दशलक्ष टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज आहे.
ब्राझीलने यंदा साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे ब्राझीलचे साखर उत्पादन ३१ दशलक्ष टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती आशिया-ब्राझील अॅग्रो अलायन्सचे प्रमुख मार्कोस एस. जँक्स यांनी सांगितले. त्याचवेळी तेथील इथेनॉलचे उत्पादन २५० लाख लिटरपासून ३०० लाख लिटर होणार आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत, त्याचवेळी न्यूयॉर्कच्या बाजारात साखरेचा दर गेल्या १० वर्षांतील निचांकी पातळीवर आहे. त्यामुळे ब्राझीलमधील कारखाने साखरेचे उत्पादन करण्यास अनुत्सुक आहेत.