ब्राझीलमधील साखर उत्पादनात २७ टक्क्यांनी घट

नवी दिल्ली चीनी मंडी

     ब्राझीलमधील साखर उत्पादन गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर आले आहे. देशात १ एप्रिल ते १६ नोव्हेंबर दरम्यानचे साखर उत्पादन २५० लाख १३ हजार टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरवर्षीच्या उत्पादनापेक्षा हा आकडा २७ टक्क्यांनी घटले आहे. विशेष म्हणजे, २००८-०९नंतरचे आजवरचे सर्वांत कमी साखर उत्पादन आहे.

    नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात २११ लाख टन ऊस गाळप झाले आहे. गाळप झालेला ऊस हा दरवर्षीच्या गाळपापेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे आणि आधीच्या दोन आठवड्यांतील गाळपाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी आहे. या प्रांतात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ऊस उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात गाळप कमी झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार एकूण गाळप झालेला ऊस ५ हजार ३९० लाख ४३ हजार टनाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत हे गाळप ४.६ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत साखरेचे उत्पादन ७ लाख ७७ हजार ४४० टन होणे अपेक्षित आहे. दर वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादनही ३८ टक्क्यांनी कमी असून, ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत १९ टक्क्यांनी घसरले आहे. 
केवळ साखरेच्या उत्पादनावरच नाही, तर इथेनॉल उत्पादनावरही पावसाचा परिणाम दिसत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांतील इथेनॉल उत्पादन ८ हजार १६० लाख लिटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत यात ३९.५ टक्क्यांची वाढ झाली असून, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत सर्वांत निचांकी उत्पादन आहे.

     १ एप्रिलपासून सुरू झालेल्या हंगामानंतर १६ नोव्हेंबरपर्यंत झालेले एकूण इथेनॉल उत्पादन गेल्या वर्षीच्या (१९० कोटी ४३ लाख लिटर) आकडेवारीच्या तुलनेत ४५.५ टक्क्यांनी जास्त आहे. आजवर १६ नोव्हेंबरपर्यंत झालेले हे सर्वाधिक उत्पादन असून, एकूण हंगामातील सर्वाधिक इथेनॉल उत्पादन आहे. यापूर्वी २०१०-११मध्ये १७० कोटी ९७ लाख लिटर उत्पादनाचा उच्चांक झाला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये झालेले इथेनॉल उत्पादन ३ हजार १४० लाख लिटर असणार आहे. दरवर्षीच्या याच काळातील आकडेवारीपेक्षा ते ३२ टक्क्यांनी जास्त असून, ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांतील आकडेवारीच्या २१ टक्क्यांनी कमी आहे. त्याचवेळी यावर्षीच्या हंगामातील हे सर्वांत निचांकी उत्पादन आहे.

    इथेनॉलच्या १ एप्रिल ते १६ नोव्हेंबर या काळातील उत्पादनावर नजर टाकली तर ८६० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. हे उत्पादन १५ टक्क्यांनी घसरल्याचे दिसत असून, २०१२-१३नंतरचे आजवरचे निचांकी उत्पादन आहे. त्या हंगामात याच काळात ७९० कोटी लिटर उत्पादन झाले होते.

SOURCEChinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here