ब्राझीलच्या साखर उत्पादनाच्या अंदाजात ३,००,००० टनांची कपात : ब्रोकर हेजपॉईंट ग्लोबल मार्केट्स

साओ पाउलो :ब्राझीलमध्ये एप्रिल २०२४ ते मार्च २५ या कालावधीत साखर उत्पादन ३,००,००० मेट्रिक टनांनी कमी होऊन ४१.३ दशलक्ष टन होईल, असा अंदाज ब्रोकर हेजपॉईंट ग्लोबल मार्केट्सने सोमवारी व्यक्त केला. साखर उत्पादनासाठी उसाचे वितरण अपेक्षेपेक्षा कमी आणि उसाची खराब गुणवत्ता यामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेजपॉईंटचे साखर विश्लेषक लिव्हिया कोडा यांनी म्हटले आहे की, प्राथमिक अंदाजापेक्षा कमी ऊस साखर उत्पादन होण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यतः गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी पीक गुणवत्ता आणि काढणीचा वेग यास कारणीभूत ठरणार आहे. उसाच्या वितरणाचे प्रमाण लक्षात घेता अनुमानीत साखर मिश्रणाचे प्रमाण पूर्वीच्या ५१.२ टक्क्यावरून ५०.३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

ब्राझिलियन कारखान्यांमध्ये बाजारभावानुसार साखर किंवा इथेनॉल उत्पादन केले जाते. जेव्हा साखरेला चांगला दर असतो तेव्हा ते इथेनॉल उत्पादन कमी करून साखर उत्पादनावर भर देतात. यावर्षी विश्लेषक आणि व्यापाऱ्यांनी साखर उत्पादनासाठी विक्रमी ऊस वाटपाची अपेक्षा केली होती. कारण अनेक कारखान्यांनी अधिक साखर उत्पादनासाठी गुंतवणूक केली होती. परंतु युनिका उद्योग समूहाकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, साखरेचे मिश्रण अपेक्षेपेक्षा कमी आहे.

ब्रोकर हेजपॉईंट ग्लोबल मार्केट्सने म्हटले आहे की,आम्ही साखर मिश्रणाचा अंदाज अतिरिक्त लावला. आता आमचा अंदाज कमी करणे योग्य वाटते. पीक वाढीच्या काळात प्रतिकूल हवामानामुळे साखरेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी दर्जाचे दिसून येत आहे, तथापि, नवीन हंगामाच्या पहिल्या महिन्यांतील गाळपाचे प्रमाण अधिक असल्याने दलालांनी या हंगामात जास्त गाळप होण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रक्रिया केल्या जाणाऱ्या उसाचे प्रमाण पूर्वीच्या ६१३ दशलक्ष टनांवरून किंचित वाढवून ६२० दशलक्ष टन करण्यात आले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here