साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस गाळपाचे हंगाम २०२३-२४ मधील पहिले अनुमान ५९८.५० मिलियन मेट्रिक टनापासून वाढून ६०६.५ मिलियन मेट्रिक टन होईल, अशी अपेक्षा असल्याचे कन्सल्टन्सी फर्म डेटाग्रो (Datagro) ने म्हटले आहे.
Datagro क्रॉप सर्व्हेच्या कृषीविज्ञान टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे ब्राझील सध्या चांगली रिकव्हरी मिळवत आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात उसाच्या शेतांमध्ये तोडणीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
डाटाग्रोने म्हटले आहे की, हंगाम २०२३-२४ साठी ब्राझीलचे साखर उत्पादन उच्चांकी ३९.१ मिलियन मेट्रिक टन होईल, अशी शक्यता आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ३८.४७ मिलियन टन हा उच्चांक आहे. ऊस आणि मक्क्यापासून इथेनॉल उत्पादन ३१.१९ बिलियन लिटर होईल. मक्यावर आधारित जैव इंधनातील वाढीमुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन ७.९ टक्के अधिक आहे. मक्क्यापासून जैव इंधन उत्पादन गत हंगामापेक्षा २१ टक्के वाढून ५.४ बिलियन लिटर होईल अशी शक्यता आहे.