नवी दिल्ली : चीनी मंडी ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त साखर उत्पादन होत असल्याचे संकेत मिळू लागल्याने त्याचा परिणाम साखरेच्या दरांवर झाला. ब्राझीलच्या आयसीई बाजारात कच्च्या साखरेचे दर खालीच राहिले आहेत. कॉफीने मात्र, २ टक्क्यांची वाढ अनुभवली आहे. मार्च कच्ची साखर प्रति पाऊंड ०.१४ सेंटसनी किंवा १.१ टक्क्यांनी घसरली असून, त्याची प्रति पाऊंड किंमत १२.३४ सेंटसवर आली आहे. गेल्या शुक्रवारी सात आठवड्यांतील निचांकी १२.३३ सेंटसवर साखर होती. पुन्हा साखर त्याच्या निचांकी दरावर पोहोचली आहे.
साखर विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या पेट्रोब्रास या पेट्रोलियम महामंडळाने मंदीच्या पार्श्वभूमीवर गॅसची किंमत कमी केली. त्यामुळे उसाचा साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनाकडे जाणारा कल कमी झाला आहे. या संदर्भात ब्राझीलमधील एका फायनान्स कंपनीचे उपाध्यक्ष टॉम कुजावा म्हणाले, ‘तेलाच्या बाजारातील घडामोडींचा परिणाम ब्राझीलमधील इथेनॉल उत्पादनावर होत आहे. गेल्या काही महिन्यात उसापासून इथेनॉल ऐवजी साखर तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ’
ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत कमी ऊस गाळप आणि साखर उत्पादन कमी झाले आहे. या संदर्भात मारेक्स स्पेक्ट्रॉन म्हणाले, ‘प्रत्येक गोष्ट अपेक्षेपेक्षा चांगली घडत गेली. काही साखर कारखान्यांमध्ये काम थांबले. तर काही ठिकाणी ऊस तोडणी लांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतातून साखर निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे ब्राझीलमधील बाजारपेठ बॅकफूटवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातून आणखी साखर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणि कमी काळात साखरेच्या किमतींवर आणखी दबाव वाढणार असल्याचे ब्राझीलमधील तज्ज्ञांचे मत आहे. ब्राझीलचे चलन मजबूत होत असल्यामुळे बाजाराला उभारी आली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातून चांगला नफा मिळत नाही, असे सांगत विक्रेते कॉफी सारख्या डॉलर मिळवून देणाऱ्या वस्तू विकत नाहीत.