लंडन : ब्रिटन मध्ये एक महिन्यामध्ये 1.4 लाख लोकांची नोकरी गेली आहे. या आकड्यांनुसार जूनमध्ये 1,39,000 पेक्षा अधिक नोकर्या गेल्या आहेत. इन्सॉल्वेंसी सर्विस कडून बेरोजगारांचे भयावह आकडे समोर येत आहेत, काही दिवसांनंतर ब्रिटनमध्ये अधिकृतपणे मंदीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारच्या नोकर्यांमध्ये कपात करणार्या फर्मची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच टक्के वाढून 1,778 इतकी झाली आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या लाकॅडाउन नंतर वर्षाच्या दुसर्या तिमाहीच्या आकड्यांनुसार, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. हे वर्ष पहिल्या तीन महिन्यांमध्ये आउटपूट घटल्यानंतर आले आहे. सातात्याने दोन तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था संपुष्टात येण्यालाच आर्थिक मंदी मानले जात आहे. आर्थिक संकट आल्यानंतर ही पहिली घोषित आर्थिक मंदी असेल.
संघर्ष करणार्या सिटी सेंटर फर्म च्या मदतीसाठी जीडीपी घेंणार्या केपन्यांना पुन्हा ऑफिसला येण्याचा आग्रह केला जात आहे. अशी शक्यता अहे की, घरातून काम केल्याने अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले आहे कारण व्यस्त कार्यालयांवर अवलंबून असणारे व्यवसाय उदा. सँडविचची दुकाने आणि पब पासून ड्राइ क्लीनर आणि हेयरड्रेसर पर्यंत सर्व काम धंदे वंचित झाले आहेत. कारण लोक ऑफिसमध्ये जात नाही. घरातूनच काम करत आहेत.
सॅन्डविच ची चेन प्रेट एक मेंगर आणि अपर क्रस्ट दोघानींही पूर्वीपासूनच हजारो लोकांना नोकरीतून काढून टाकले आहे. काल प्रेट ने आपल्या कामावर असणार्या कर्मचार्यांचे कामाचे तास कमी करण्यास सांगितले आहे. रोजगार तज्ञ यांनी सांगितले की, देशात येणार्या महिन्यांमद्ये वाढणार्या बेरोजगारीसाठी तयार राहिले पाहिजे. तसेच अधिक फर्म कडून कपात होण्याची घाषणेची शक्यता आहे, ज्यामद्ये आतिथ्य आणि पर्यटन क्षेत्र प्रमुख राहतील. चार्टर्ड इंन्स्टीट्युट ऑफ पर्सनल एंड डेवलपमेंट चे गेरविन डेविस यांनी सांगितले की, व्यवसाय आता दर वाढण्याच्या समस्येचा सामना करत आहे. कारण सरकारने आपल्या रोजगार योजनेला कमी केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.