उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याची ब्रिटानिया इंडस्ट्रिजची योजना

लखनौ : ब्रिटानिया इंडस्ट्रिजने उत्तर प्रदेशातील आपल्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड प्लॅनमध्ये जवळपास 300 करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे. ब्रिटानिया कंपनी पूर्वीपासूनच आपल्या प्रस्तावित प्लांटसाठी मध्य यूपी मध्ये जमीनीच्या शोंधात आहे. या योजनेमुळे 1,500 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच साखर आणि गव्हाच्या पीठाची स्थानिक पुरवठा शृंखला समृद्ध होण्याची शक्यता आहे.
योगी आदित्यनाथ सरकार उद्योग, पर्यटन आदींसहीत विविध क्षेत्रांमद्ये गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी आपल्या अजेंड्याला जोरदार पद्धतीने पुढे नेत आहेत. याबाबत, राज्याला जास्तीत जास्त व्यापारास अनुकूल बनवण्यासाठी अनेक नव्या संशोधित नितींची घेषणा करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव आलोक कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, ब्रिटानिया ने राज्यातील हरदोई किंवा बाराबंकी जिल्ह्यामध्ये ग्रीनफिल्ड प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्तावित प्लंट जवळपास 30 एकरमद्ये स्थापन होईल आणि विविध प्रकारच्या कन्फेक्शनरी उत्पादनांची निर्मिती करेल, ज्यामध्ये ब्रेड, बिस्कीट आदिंचा समावेश आहे. औद्योगिक विभागाचा प्रारंभिक अहवाल प्रस्तुत केल्यानंतर आणि सरकारकडून निरीक्षण केल्यानंतर या योजनेला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here