लंडन : चीनी मंडी
यंदाच्या साखर हंगामात अपेक्षेपेक्षा जास्त बीट उत्पादन होई, असा अंदाज ब्रिटिश शुगर कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बीट उत्पादकांनी यंदा ११ लाख ५० हजार टन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. नोव्हेंबर २०१८मध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात १० लाख ५० हजार टन बीट उत्पादन होईल असे म्हटले होते. त्यामुळे आता बिटाची तोडणी चांगली होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा बिटाचे क्षेत्र कमी झाले होते. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा १३ लाख ७० हजार टनापेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे दिसत आहे.
ब्रिटिश शुगर या कंपनीची प्रमुख कंपनी असलेल्या असोसिएट ब्रिटिश फूड्सने ५ जानेवारीपर्यंत च्या १६ आठवड्यांतील आकडेवारी जाहीर केल्यानंतर ब्रिटिश शुगरने आपला अंदाज व्यक्त केला आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp