शिलाँग : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मेघालयने साखर तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला असून पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चार भारतीय नागरिकांना पकडण्यात आल्याची माहिती बीएसएफ मेघालयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विशिष्ट गोपनिय माहितीच्या आधारावर कारवाई करताना, बटालियन १९३च्या सतर्क कर्मचाऱ्यांनी १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची साखर भरलेली दोन अवजड वाहने अडवली.
मेघालयच्या पूर्व खासी हिल्समधील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एमएल १२ – ३८४३ आणि एमएल ०५ एडी ३६१४ असे नोंदणी क्रमांक असलेली वाहने थांबवण्यात आली. तस्करीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे असे बीएसएफ मेघालयने सांगितले. जप्त केलेला माल आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पुढील तपास, कायदेशीर कारवाईसाठी डांगर येथील कस्टम कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हा माल बांगलादेशात तस्करीसाठी पाठवला जात होता.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.