BSF मेघालयकडून बांगलादेशात तस्करी केली जाणारी साखर जप्त

मेघालय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौथ्या बटालियनच्या सतर्क जवानांनी रविवारी आणि सोमवारी यांदरम्यान मध्यरात्री ५६०० किलो भारतीय साखरेसह भारतातून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बांगलादेशात अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना एका बांगलादेशी नागरिकाला पकडले.

मिळालेल्या खास माहितीच्या आधारे, ३ सप्टेंबर रोजी, बीएसएफ मेघालयच्या चौथ्या बटालियनने एका बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात यश मिळविले. हा संशयित साखरेची पोती घेऊन भारतातून बांगलादेशात बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता.

जप्त केलेला मुद्देमाल व पकडलेल्या व्यक्तीस पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी मुक्तापुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here