ढाका : Bangladesh Sugar and Food Industries Corporation (BSFIC)ने देशभरात अलिकडे साखरेच्या दरवाढीस कारणीभूत असलेल्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. राज्याच्या मालकीच्या साखर कारखान्याने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, एक किलो ऑरगॅनिक साखरेचे पाकिटची किरकोळ विक्री किंमत Tk85 निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही जण या पाकिटावरील दर बदलून त्याची विक्री Tk100-120 अशा वाढीव दराने करीत आहेत.
BSFIC कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे महामंडळ आणि त्यांच्याकडून उत्पादित सेंद्रीय, आरोग्यदायी, लोकप्रिय ऑरगॅनिक पांढऱ्या साखरेची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. ग्राहकांनी साखरेसाठी अतिरिक्त पैसे देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. आणि BSFIC कडून उत्पादित साखर खरेदी करताना त्याच्या पाकिटाची सावधतेने तपासणी करावी.