बुलंदशहर, उत्तर प्रदेश: भाजपची ग्रामीण आणि शहरी मंडळाची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती . यामध्ये ग्रमाीण मंडळाची बैठक अच्छेजा घाट आणि बुलंदशहर कालाआम मडळाची बैठक विवेकानंद सरस्वती विद्या मंदीर डीएम रोडवर आयोजित करण्यात आली.
ऊस मंत्री सुरेश राणा यानीं सांगितले की, भाजपा ने नेहमी गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या दृष्टीने विचार केला आहे. बसपा सरकारने साखर कारखाने कवडीमोल किंमतीत विकले होते. तेव्हा बंद पडलेल्या त्या कारखान्याला चालवण्याचे काम भाजपाने केले आहे. यामुळे शेतकर्यांचा मोठा फायदा झाला. राज्यमंत्री कपिल देव अग्रवाल यांनी सांगितले की, निवडणुकीची तारीख केव्हाही जाहिर होवू शकते. आता आपल्याला निवडणुकीच्या तयारीमध्ये पूर्णपणे व्यस्त झाले पाहिजे. मोदीजींनी उज्ज्वला योजने एंतर्गत प्रत्येक गरीबाला मोफत गॅस देण्याचे काम केले आहे. जेव्हा गरीब माता भगिनी चुली फुंकायच्या तेव्हा त्याचा धूर त्यांच्या फुफ्फुसापर्यंत जात होता आणि पुढे त्याचे रुपांतर आजारात होत होते. हे प्रकार पंतप्रधान मोदीजींनी समजून घेतले.
यावेळी क्षेत्रीय उपाध्यक्ष प्रवेंद्र जांगडा, मंडळ प्रभारी विजेंद्र प्रताप सोलंकी, आमदार होराम सिंह, जिल्हा महामंत्री संजय गुर्जर, संजय चौधरी, संतोष बाल्मिकी, नागेंद्र प्रधान, संजय माहेश्वरी, अध्यक्ष गौरव मित्तल, सत्येंद्र पाल, तुषार गुप्ता, पूजा गुप्ता आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.