मनिला : बुकिडॉन चे गव्हर्नर जोस मारिया जुबिरी यांनी 20 एप्रिल ला प्रांतातील दोन साखर कारखान्यांना गाळप कार्य पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना वायरस चा फैलाव रोखण्याच्या उपायाचा एक भाग म्हणून जुबिरी यांनी 28 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत कारखान्यांना बंद करण्याचा आदेश दिला होता. कृषि सचिव विलियम डार यांनी कारखान्यांना पुन्हा सुरु करण्याची अनुमति दिली होती.
टाळेबंदीच्या पूर्वी 12 एप्रिल आणि पुन्हा 26 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. शेवटची वाढ 9 एप्रिल ला वालेंसिया शहरामध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर केली. 13 एप्रिल पासून टाळेबंदीचा नियम दोन आठवड्यासाठी कडक उपायांसह लागू करण्यात आला. गुरुवारी जुबिरी च्या घोषणेनंतर क्वेजोन शहरात बुस्को शुगर मिलिंग कंपनी ने ऊस उत्पादकांना सूचित केले की, ते 18 एप्रिलपासून उत्पादन खरेदी करण्यासाठी खुले राहतील. बुस्को जे ऊस उत्पादक रिलेशन ऑफिसर एडुआर्ड वी.कार्लोस यांनी सांगितले की, कंपनीला प्रति आठवडा कमीत कमी 110,000 मेट्रिक टन ऊसाची आशा आहे.
मरामग मध्ये असणारी क्रिस्टर शुगर कंपनीनेही शेतकर्यांना सूचित केले की, ही कंपनी ऊस खरेदीसाठी आपले दरवाजे खुले राहतील. बुस्को आणि क्रिस्टल यांनी सांगितले की, हे कारखाने 20 एप्रिल च्या सकाळी 12:02 वाजता गाळप प्रक्रिया सुरु करतील. कर्लोस यांनी ऊस उत्पादकांना कोरोना शी निपटण्याच्या उपायांचे पालन करण्यासाठी सांगितले आहे. ज्यामध्ये मास्क घालणे आणि साामजिक आंतर ठेवणे यांसारखे उपाय सामिल केले आहेत. बुस्को आणि क्रिस्टल या दोन्ही 500 पेक्षा अधिक कष्टकर्यांना रोजगार देतात आणि 10,000 पेक्षा अधिक उत्पादकांकडून ऊस खरेदी करतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.