बुलंदशहर : पहासू येथील त्रिवेणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना शंभर टक्के बिले अदा करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. साखर कारखान्याने २०२२-२३ या हंगामातील ऊस गाळपाची समाप्ती करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. मात्र, कारखाना प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास दिलेल्या प्राधान्यक्रमामुळे जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांमध्ये ऊस बिले देण्यात त्रिवेणी साखर कारखाना अग्रस्थानी आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याकडील आकडेवारीनुसार, त्रिवेणी साखर कारखान्याने आतापर्यंत १०९ लाख क्विंटल म्हणजेच ३४५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. मार्च २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३४३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. ही रक्कम ९८ टक्के आहे. उर्वरीत २ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत प्रक्रीया केली असल्याचे कारखान्याचे सरव्यवस्थापक प्रदीप खंडेलवाल यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे असे आवाहन त्यांनी केले आहे.