जकार्ता: इंडोनेशिया च्या स्टेट लॉजिस्टिक एजंसी (बुलोग) चे अध्यक्ष निदेशक बुडी वासेसो यांनी स्थानिक उत्पादन आणि भारतातून आयातीत साखरेच्या माध्यमातून जून मध्ये साखरेचा पुरेसा साठा ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. जेणेकरुन स्थानिक बाजारामध्ये साखरेच्या किमती नियंत्रीत राहतील. वासेसो यांनी सांगितले की, बुलोग यांच्या जवळ जूनमध्ये 75 हजार टन साखरेचा स्टॉक असेल, ज्यामध्ये 25 हजार टन घरगुती साखर आणि 50 हजार टन आयातित साखरेचा समावेश असेल. भारतातून 50 हजार टन साखर आयात केली आहे, ज्यामध्ये 21,800 टन देशामध्ये आली आहे. तर उर्वरीत पुढच्या आठवड्यापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. आमचे उत्पादन पुढच्या महिन्यापर्यंत जवळपास 25 हजार टन होईल. यासाठी, लोकांना चिंता करण्याची गरज नाही. भारतामध्ये लॉकडाउन लागू करण्यात आल्याने आयातीमध्ये अडथळा आला आहे.
नॅशनल सेंटर फॉर नॅशनल स्ट्रेटेजिक फूड प्राइस यांच्या आकड्यानुसार, ग्राहकाच्या स्तरावर आरपी 12,500 प्रति किलो च्या संदर्भ मूल्याच्या तुलनेत शुक्रवारी साखरेची किंमत सरासरी आरपी 17,400 प्रति किलो होती. बुलोग यांनी रिटेल विक्रेत्यांना आरपी 11,000 प्रति किलो पांढरी साखर विकण्यासाठी पूर्ण इंडोनेशिया मध्ये एकाचवेळी कार्य सुरु झाले, जेणेकरुन ग्राहक स्तरावर ही किंमत आरपी 12,500 प्रति किलो किंवा त्यापेक्षा कमी किमतीवर साखर विकण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही नियम तोडणार्या व्यापार्यांविरोधात फूड टास्क फोर्स मध्ये तक्रार दाखल करु असे त्यांचे म्हणणे आहे .
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.