बिजनौर : जिल्ह्यातील बुंदकी आणि बहादरपूर साखर कारखान्याने गेल्यावर्षीपेक्षा अधिक उसाचे गाळप केले आहे. दोन्ही कारखाने अद्याप उसाचे गाळप करीत आहेत. बहादरपूर कारखान्याने गेल्यावर्षी केलेल्या ११९ लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा १२३ लाख क्विंटल आणि बुंदकी कारखान्याने गतवर्षीच्या १२८ लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा १३३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.
बहादरपूर आणि बुंदकी साखर कारखाने गेल्यावर्षीपेक्षा जास्त गाळप करीत आहेत. अद्यापही दोन्ही कारखाने सुरू आहेत. यंदा लागवडीच्या तुलनेत उत्पादन अधिक मिळाले आहे. त्यामुळे कारखाने अद्याप बंद करण्यात आलेने नाहीत. जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून ११६ रसवंती आणि २००० घाण्यांकडून ऊस खरेदी केला जातो. सध्या काही घाण्यांकडून अद्याप ऊस खरेदी सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्यावर्षी ११ कोटी ४२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. यंदाही याच आकडेवारी पर्यंत कारखाने पोहोचले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ११ कोटी ५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षीइतके अथवा त्यापेक्षा अधिक गाळप होऊ शकते अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील कारखाने ३० मेअखेर गाळप करतील अशी शक्यता आहे. धामपूर आणि स्योहारा साखर कारखाना ३० मेपर्यंत सुरू राहू शकतात.
दरम्यान बहादरपूर आणि बुंदकी साखर कारखान्याने गेल्यावर्षीपेक्षा अधिक गाळप केले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ११ कोटी ५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. धामपूर, स्योहारा कारखाने ३० मे पर्यंत सुरू राहू शकतील अशी माहिती बिजनौरचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी दिली.