ऊस शेती टाळून शेतकरी वळले भाजीपाला उत्पादनाकडे

मेहदावल (संतकबीरनगर) : काही वर्षापूर्वीपर्यंत जिल्ह्यातील उत्तरांचल प्रदेशाची ओळख ऊस शेतीमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख टिकवून होता. मात्र, खलीलाबाद साखर कारखाना बंद पडल्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांचे ऊस शेतीवरून लक्ष उडाले आहे. सद्यस्थितीत फक्त काही शेतकरीच ऊस शेती करतात. जे शेतकरी ऊस पिकवतात ते गुळाचे उत्पादन करून त्याची विक्री करतात. तर उर्वरीत शेतकऱ्यांनी उसाऐवजी भाजीपाला उत्पादनाकडे आपले लक्ष वळवले आहे.

या परिसरातील औरही, टडवा, अछिया, विसौवा, भठवा, जमुअरिया, रौना, डडिया, ददरा, कुडवा अशी अनेक गावे आहेत की जेथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस पिकवून चांगली कमाई करत होते. मात्र सहा वर्षांपूर्वी खलीलाबाद येथील साखर कारखाना बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस शेतीवरील लक्ष उडाले. नरायनपूरचे शेतकरी सुनील चौधरी सांगतात, जोपर्यंत खलीलाबादचा साखर कारखाना सुरू होता, तोपर्यंत ऊस शेतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. कारखाना बंद पडल्याचा फटका शेतीला बसला. आता कमी क्षेत्रात ऊस पिकवून गूळ तयार करण्याचा पर्याय निवडला जातो.
शेतकरी सूर्य प्रकाश चौधरी म्हणाले, उसाची शेतीमध्ये फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले लक्ष भाजीपाला उत्पादनाकडे वळवले. यामधून चांगली कमाई होत आहे. हंगामानुसार आता भाजीपाला पिके घेतली जातात. त्यातू चांगले उत्पन मिळत आहे. शेतकरी अशोक यादव यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा साखर कारखाना बंद पडला तेव्हा लोकप्रतिनिधींकडून तो सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील असे वाटले होते. मात्र, तसे घडले नाही. आता शेतकरी केळी, बटाटे, कोबी, तोंडली आदी पिके घेऊन घरखर्च चालवत आहेत. शेतकरी जवाहरलाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, खलीलाबाद कारखाना सुरू होईल अशी आम्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच आता शेतकरी ऊस शेती करण्यास धजावत नाहीत.

साखर कारखाना पुन्हा सुरू करणार – आमदार चौबे
खलीलाबाद येथील आमदार दिग्वीजय नारायण उर्फ जय चौबे यांनी सांगितले की, खलीलाबाब येथील साखर कारखाना बंद पडल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऊस लागवडीवरून लक्ष उडाले आहे. कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी सरुवातीपासून प्रयत्न सुरू आहेत. बस्तीमध्ये आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडला होता. साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक स्तरावरही मागणी केली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here