नवी दिल्ली: इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) च्या नव्या अहवालानुसार, 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत देशामध्ये 408 सागर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे आणि 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 309 साखर कारखान्यांकडून उत्पादीत 20.72 लाख टनाच्या तुलनेत, 2020-21 हंगामामध्ये 42.90 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या उत्पादनाच्या तुलनेत 22.18 लाख टन साखर उत्पादन अधिक आहे.
उत्तर प्रदेशामध्ये 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत 111 साखर कारखान्यांनी गाळपाची सुरुवात केली आहे आणि 12.65 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर, 2019 पर्यंत समान संख्येमध्ये कारखान्यांनी गाळप करुन 11.46 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
महाराष्ट्रामध्ये या हंगामात आतापर्यंत 158 साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे आणि 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत 15.72 लाख टन साखरेचे उत्पादन केंले आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत संचालित 71 साखर कारखान्यांनी 30 नांव्हेंबर 2019 पर्यंत 1.38 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. कर्णाटक राज्यात, 63 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर, 2020 पर्यंत 11.11 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या तुलनेत, गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 60 साखर कारखान्यांनी 5.62 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. गुजरातमध्ये 15 साखर कारखान्यांनी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत 1.65 लाख टन उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात 14 साखर कारखान्यांनी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 62,000 टन साखरेचे उत्पादन केले होते. इतर सर्व राज्यांमध्ये गाळप सुरु झाले आहे. आणि गाळपाची गतीही वाढली आहे. इतर राज्यांमध्ये जवळपास 61 साख़र कारखाने सुरु झाले आहेत, ज्यांनी 30 नोव्हेंबर 2020 पयंंत या हंगामात 1.77 लाख टनाचे उत्पादन केले आहे. आणि गेल्या हंगामात 1.64 लाख टन उत्पादन झाले होते.