हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मान्सूनने दडी मारल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पशु शिबिरामध्ये चारा म्हणून ऊसाची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीचे केवळ ८०००० हेक्टर क्षेत्र उरले आहे, अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस टंचाईला सामोरे जावे लागणार आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम आगामी हंगामात साखर कारखान्यांच्या उत्पादनावर सुद्धा होऊ शकतो.
गेल्या वर्षी १ लाख ३५ हजार हेक्टर ऊसाची लागवड झाली होती, परंतु मान्सूनला विलंब झाल्यामुळे ऊस क्षेत्र अर्धे झाले आहे. पाऊस नसलेमुळे, जनावरांच्या छावण्यांमध्ये ऊसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे उसाला चांगले दिवस आले असे म्हणता येईल, चाऱ्यासाठी जो ऊस घेतला जात आहे त्याला प्रती क्विटल ३५०० ते ४००० रुपये भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे जो साखर कारखान्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. एकीकडे पिकाला पाणी नाही पाण्याची कमतरता खूप आहे तर दुसरीकडे चाऱ्या छावण्यांसाठी उसाची मागणी आहे त्यामुळे शेतकरी आपला ऊस खुशीने देत आहे व चांगले पैसे मिळवीत आहे.
ऊसाचा नवीन सिझन १ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे, पण गाळपासाठी साखर कारखान्यांच्याकडे आवश्यक ऊस नसणार आहे, म्हणूनच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांबरोबर करार करण्याचे सुरु केले आहे कारण त्यांना जेवढा हवा तेवढा ऊस मिळू शकेल आणि गाळप पूर्ण क्षमतेने चालू राहील, चालू हंगामात बरेच कारखाने ऊस नसल्यामुळे बंदच राहतील अशी शक्यता आहे.