गोदामातील साखर विकून ऊस शेतकऱ्यांची देणी भागवणार

भगवानपूर : उत्तर प्रदेशातील इकबालपूर साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी बिलाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. पण, थकबाकीदार उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. इकबालपूर साखर कारखान्याच्या गोदामात पडून असणारी साखर ६० कोटी रुपयांना विकून त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या हंगामातील देणी भागवण्यात येणार आहेत. तसेच साखर कारखान्याकडे साखरेचे उत्पादन आणि वीज निर्मिती संदर्भातील अहवाल मागवण्यात आला आहे. इकबालपूर साखर कारखान्याने दोन ऊस गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे.

उत्तराखंड किसान मोर्चाने नुकताच भगवापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांचै थकीत पैसे भागवण्याची मागणी केली. जर, शेतकऱ्यांची देणी भागवली नाहीत तर, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा या वेळी मोर्चाकडून देण्यात आला. या मोर्चाची दखल घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारखान्याकडून आठ कोटी रुपयांची देणी भागवण्यात आली. त्यातून गेल्यावर्षीच्या थकीत बिलातील काही रक्कम अदा करण्यात आली आहे. परंतु, २०१८च्या  हंगामातील ऊस उत्पादकांची देणी भागवण्यासाठी गोदामातील साखर विक्री करण्यात येणार आहे. यातून कारखान्याकडे ६० कोटी रुपये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्या पैशांतून उर्वरीत देणी भागवण्यात येणार आहेत. त्याचवेळी त्याआधीची देणी भागवण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचे ७३ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. तसेच इतर राज्यातील देणीही १५ कोटी रुपयांच्या आसपास आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here