कोल्हापूर : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्काराने असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा गौरव करण्यात आला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय डी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार वितरणानंतर आमदार सतेज पाटील म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या कार्यकुशल कामगारांच्या कामाची पोचपावती आहे. गगनबावडा सारख्या दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत कारखाना उभारून तो पर्यावरणपूरक चालवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. यावेळी व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, तेजस सतेज पाटील, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, बजरंग पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत खानविलकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, संजय पडवळ, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, प्रभाकर तावडे, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, नंदू पाटील, अमर भांबुरे आदी उपस्थित होते.