मुंबई : अखेर जवळपास ३९ दिवसानंतर, मंगळवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यातील ९ मंत्री भाजपचे तर उर्वरीत ९ मंत्री शिंदे गटाचे आहेत.
मुंबई लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी शपथग्रहण केलेल्या मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. तर भाजपच्या मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावीत आणि मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे.