चॉकलेट उत्पादनातील दिग्गज कंपनी कॅडबरी (Cadbury) ने एक अशा प्रकारचे डाएट चॉकलेट लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे, ज्यामध्ये ७५ टक्के कमी साखर असेल.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखर कमी असूनही पूर्वीप्रमाणेच स्वाद टिकून राहील असा दावा कंपनीने केला आहे. ब्रँडच्या अमेरिकन मालक मोंडेलेजचे मुख्य कार्यकारी डर्क वॅन डी पुट यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच हे चॉकलेट डाएट शीतपेयांप्रमाणे सर्वांच्या पसंतीला उतरेल. ७५ टक्के साखर कमी करण्यासाठी कॅडबरी वनस्पती-आधारित फायबरचा प्रयोग करत आहे.
वॅन डी पूट म्हणाले की, हे काहीसे डाएट ड्रिंकसारखे असेल आणि त्याची विक्री खूप संथ गतीने वाढेल, परंतु आम्हाला हे उत्पादन बाजारात ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांना ते खरोखरच स्वीकारण्यास थोडा वेळ लागेल, कारण अद्याप त्याची चव पूर्वीप्रमाणे नाही, मात्र त्याच्या अगदी जवळ येत आहे. पुढील काळात आम्ही अधिक आरोग्यदायी पर्याय सादर करण्याची तयारी करीत आहोत. आणि यासाठी कठोर परिश्रम सरू आहेत. परंतु त्यांनी सॉफ्ट ड्रिंक्सवरील “शुगर टॅक्स” सह लठ्ठपणाविरोधी कायद्यांवर त्यांनी टीका केली. अशी कर प्रणाली खरोखर योग्य कार्य करत नाही, व्हॅन डी पुट म्हणाले.