राज्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही एफआरपी दिलेली नाही. त्याचबरोबर साखर कारखान्याच्या खर्चाच्या 70-30 फॉर्म्यूल्यावर निर्णयही झालेला नाही. याशिवाय अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आज होणारी ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक रद्द करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
ऊस दर नियंत्रण मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नाही. ही नेमणूक करुनच बैठक बोलवण्यात यावी अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. याबाबत शेट्टी यांनी पत्रव्यवहार केंला. या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत आज ऊस दर नियंत्रणाची बैठक होणार आहे, पण या बैठकीत शेतकरी तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे विविध प्रश्न, थकीत एफआरपी यावर चर्चा होणार नाही. त्यामुळे ही बैठक रद्द करावी, असा ठाम आग्रह राजू शेट्टी यांनी केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.