शामली : Bharatiya Kisan Union (BKU) ने ऊस थकबाकी आणि भूमी अधिग्रहण तसेच वीज बिलांच्या तक्रारींची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी शामली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हिंदूस्तान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, BKU चे नेते राकेश टिकेत हे सुद्धा धरणे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना भीती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. रात्री उशीरापर्यंत कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. चर्चेशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही, असा इशारा टिकेत यांनी दिला आहे. टिकेत यांनी दावा केला की जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ५६० कोटी रुपये थकीत आहेत. सरकार खोटी आकडेवारी सादर करून लोकांची फसवणूक करीत आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ऊस बिल थकबाकी: Bharatiya Kisan Union च्या वतीने शामलीत बेमुदत धरणे आंदोलन...