समस्तीपूर: हसनपूर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी तीन राज्यातून आलेल्या इंजिनिअर्सची टीम कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 च्या हंगामात 85 लाख क्विंटल ऊस गाळपाचे ध्येय आहे.
आगामी ऊस गाळप हंगाम पाच महिन्याचा असेल, असे सांगण्यात आले आहे. नोंव्हेंबर पासून मार्चपर्यंत साखर कारखाने ऊस गाळप करतील. 2019-20 या हंगामात प्रतिदिन 50 हजार क्विंटल ऊस गाळपाची क्षमता आहे. आता आगामी हंगामात ऊस गाळप क्षमता 65 हजार क्विंटल प्रतिदिन असेल. शेतकर्यांना ऊसाचे पैसे दिले जात आहे. 10 मार्च पर्यंतचिं ऊस थकबाकी शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ऊस उपाध्यक्ष शभू प्रसाद राय यांनी सांगितले की, शेतकर्यांना मेहनत करताना पाहून साखर कारखान्याचे विस्तारीकरण केले जात आहे. जेणेकरुन पाच महिन्याच्या आत ऊस गाळप वेळेवर होवू शकेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.