बहराइच : चिलवरीया येथील शिंभावली साखर कारखान्यात शुक्रवारी रात्री उशीरा गळीत हंगामाची समाप्ती झाली. यावर्षी २५ फेब्रुवारी रोजी कारखान्याचे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ऊस पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, ऊस उपलब्ध न झाल्याने गाळप बंद करण्यात आले. चिलवरीया साखर कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील ४४ कोटी रुपयांसह नव्या हंगामातील १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.
चित्तौरा विकास खंडच्या चिलवरीया येथील शिंभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम २७ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून कारखाना ऊस गाळप करीत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कारखान्याकडे ऊस आला नाही. याबाबत कारखाना प्रशासनाने २५ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना कारखान्याकडे ऊस पाठविण्याचे आवाहन केले. खूप प्रयत्न केल्यानंतर फक्त १० क्विंटल ऊस मिळाला. त्याचे गाळप केल्यानंतर कारखाना बंद करण्यात आला.
कारखान्याचे सरव्यवस्थापक पी. एन. सिंह यांनी सांगितले की, जेवढा ऊस उपलब्ध होता, त्याचे गाळप करण्यात आले आहे. आता ऊस नसल्याने कारखाना बंद केला आहे. दरम्यान, कारखान्याकडे गेल्या हंगामातील ४४ कोटी आणि नव्या हंगामातील १०० कोटी रुपये थकीत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी शैलेश कुमार मौर्य यांनी सांगितले की कारखान्याकडे १४४ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. कारखान्याने १५ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरीत पैशांसाठी पत्रव्यवहार सुरू आहे