हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
चीनीमंडी, अयोध्या : मुलांच्या शाळेच्या फी, लग्न समारंभ तोंडावर असताना ऊस शेतकऱ्यांसमोर पैश्यांच्या अडचणींचा डोंगरच येऊन उभा राहिला आहे. नियमानुसार एफआरपी ची देणी ऊस मिळाल्यांनतर १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे तरी कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत.
सध्या जिल्ह्यातील दोन्ही कारखान्यांवर ९३.७४ कोटींची देणी आहेत, शेतकरी हक्कांच्या पैश्यासाठी दारो – दारी भटकत आहेत तर प्रशासकीय अधिकारी कारखानदारांच्या बाजूने बोलत आहेत.
जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी या साखर हंगामात ७३ हजार ३०५ हेक्टर मध्ये ऊस उत्पादन केले आहे. हा ऊस येथील केएम शुगर मिल्स लिमिटेड मोतीनगर, मसौधा व रौजागांव साखर कारखान्याने विकत घेतला तरी अजून त्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचले नाहीत त्यात शासनाने या वर्षीही ऊसाची किंमत वाढवली नाही.
देणी पाहता, रौजागांव कारखान्याने १६२.५३ कोटींचा ऊस खरेदी केला ज्यातील १४६.४८ कोटींची भरपाई झालेली आहे व १६ .०५ कोटी अजून देणी बाकी आहेत.
मसौधा कारखान्याने आतापर्यंत १८७.१६ कोटींचा ऊस खरेदी केला ज्यातील १०९.४८ (५८%) कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात आले आहेत अजूनही ७७.६९ कोटी रुपये देणे बाकी आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्न समारंभ तोंडावर आहेत, मुलांच्या शाळेच्या फी देणे आहेत या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहेत कारण साखर कारखाने देणी भागविण्यात अपयशी ठरत आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी ए पी सिंह यांनी सांगितले कि रौजागांव साखर कारखाना लवकरात लवकर देणी भागवत आहे पण मसौधा साखर कारखाना देणी भागविण्यात मागे पडत आहे व ९३. ७४ कोटींचे देणे अजून बाकी आहे. या संदंर्भात त्वरित देणी भागवण्याबाबत कारखानदारांना नोटिस देण्यात आले आहेत.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp