कोल्हापूर, ता. 10 : साखर कारखान्यांनी एफआरपीचा पहिला हप्ता दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेच्या बदल्यात शेतकऱ्यांना साखर देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एफआरपी च्या बदल्या साखर घेण्यास शेतकरी नकार देत आहेत. याउलट ज्या वेळी कारखान्यांकडे पैसे येतील त्यावेळी आम्हाला आमच्या बँक खात्यावर उर्वरीत एफआरपी जमा करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर राज्यातील शेतकऱयांची तब्बल 3000 कोटींची एफआरपी जमा झाली आहे. कारखान्यांनी प्रतिटन 2300 रुपये शेतकऱयांच्या नावावर जमा केले आहेत. मात्र उर्वरित रक्कम देण्याऐवजी साखर द्यावी या मागणीला शेतकऱ्यांकडूनच प्रतिसाद मिळत नाही.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp