मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांनी स्वीकारला तोडणी मशीनचा पर्याय

म्हैसूर : ऊस तोडणीसाठी एकाचवेळी असंख्य मजुरांची गरज भासते. या कामासाठी मजुरांची सेवा घेणे हे महागडे काम आहे. याशिवाय, हंगामात पुरेसे मजूर मिळवणेही सहज सोपे नसते याचा साखर उद्योगातील जाणकारांना अनुभव आहे. त्यामुळे म्हैसूर आणि चामराजनगरमधील शेतकरी आता ऊस तोडणीसाठी मशीनकडे वळू लागले आहेत. यापूर्वी म्हैसूर तसेच चामराजनगरमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगामाच्या कालावधीत मजुरांची जमवाजमव करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. मात्र, आता ऊस तोडणी मशीनच्या माध्यमातून त्यांच्या वेळेची बचत होण्यासह कामगारांवरील खर्चही कमी होऊ लागला आहे. तोडणी मशीनच्या माध्यमातून तोडलेल्या ऊस पिकामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांमध्ये रांगा लावून थांबावे लागत नाही. मशीनचा वापर ऊसाचा पाला तोडण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्याचा वापर नंतर जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो.

म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात जवळपास १७,००० शेतकरी ऊस शेती करतात. एकूण ३३,११७ एकरामध्ये ऊस पिक घेण्यात आले आहे. शेतकरी आपले ऊस पिक नंजनगुडमधील बन्नारी अम्मान शुगर लिमिटेडसारख्या स्थानिक युनिटना पुरवठा करतात. स्थानिक साखर कारखाने बळ्ळारी, विजयपुरा, रायचुरू आणि उत्तर कर्नाटकमधील इतर जिल्ह्यांशिवाय शेजारील राज्यांतील कामगारांना कामावर ठेवतात. या कामगारांना म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यातील शेतांवर पाठवले जाते. स्थानिक साखर कारखान्यांनी शेजारील तामिळनाडूमधून तोडणी मशीन भाड्याने आणली आहेत. ज्या भागात किमान ४० एकर ऊस पिक आहे, अशा ठिकाणी ही मशीन पाठविण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here