कोल्हापूर, दि. 7 ; शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी योग्य निर्णय सरकारने काढावा अन्यथा 2013 मध्ये ऊस दरासाठी जसा उद्रेक झाला तोच उद्रेक 2018-2019 साठी दिसून येईल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सांगली येथे ऊस उत्पादक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी ते बोलत होते.
खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील. ऊस दरासाठी रविवारी (ता.11 आम्ही ऊस पट्ट्यात सर्व व्यवहार बंद ठेवणार आहोत. या एक दिवसाच्या संपात आम्ही आमचा राग व्यक्त करणार आहोत. असे खासदार शेट्टी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्याला भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला.