कोल्हापूर, दि. 27 : या वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये प्रतिटन उसाला एफ आर पी अधिक 200 रुपये द्यावेत अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. यामागणी नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साडेबार रिकव्हरी नूसार 3217 रुपये दर द्यावा, अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला. जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
खासदार राजू शेट्टी म्हणाले ” उसाची 9.50 रिकव्हरी बेस धरला पाहिजे. एफ आर पी 2750 अधिक 200 आणि त्यावरील प्रत्येक 1 % रिकव्हरीला 289 रुपये यानुसार प्रतिटन ऊस किमान 3217 दर उत्पादकाला दिला पाहिजे.
शासनाने तत्काळ तसे परिपत्रक काढले पाहिजे. शेतकरी मागितलेला दर साखर कारखाने जाहीर करत नाहीत तोपर्यंत कारखाने चालू होऊ देणार नाही,” असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे .
एफ आर पी अधिक 200 रुपये हा दर त्यांनी मान्य केला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी जी घोषणा केली आहे, त्याचा फक्त शासन निर्णय काढावा,” अशी मागणी शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी यांनी मागणी केल्यानुसार प्रतिटन उसाला मिळणारा दर उसाला मिळणारा दर
• बेस -9.5 टक्के
• दिली जाणारी उचल- 2750
• कोल्हापूरमध्ये सरासरी 12.5 उतार्याला मिळणार – 3617
• तोडणी वजा – 600
• प्रत्यक्ष मिळणार -3017
• शेट्टींची मागणी -3017
अधिक 200 रुपये असे 3217
मिळणार