नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्माला सितारामन यांनी शुक्रवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत देशाची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे सांगितले. यासंबंधीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आपल्या देशाचा विकासदर दुसर्या देशापेक्षा चांगला आहे. सध्या अमेरिका आणि जर्मनीचा विकासदर देखली कमी होताना दिसत आहे. सर्व देश सध्या मंदीच्या समस्येने त्रस्त आहे. सध्याचा जागतिक जीडीपी 3.4 टक्के आहे.
अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धाचा यावर परिणाम होत आहे. निर्मला सितारामन म्हणाल्या, आरबीआय कडून व्याजदरात कपात करण्यात आल्याचा फायदा ग्राहकांना देण्यावर सर्व बँकांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर कर्जावरील ईएमआय कमी केले आहे. सरकारी बँक कर्ज पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांच्या आत ग्राहकांना कागदपत्रे देण्यात येतील. आता सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाईन असतील. लोन अॅप्लिकेशनची ऑनलाईन ट्रॅकिंग होईल.
अर्थमंत्र्यांनी नॅशनल हौसिंग बँक द्वारा हौसिंग फायनान्स कंपन्यांसाठी 20,000 हजार करोड अतिरिक्त सहायता निधीची सुद्धा घोषणा केली आहे, ज्यामुळे हे कर्ज 30,000 करोड पर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर जीएसटी रिटर्न आणि रिफंड करणे सोपे होणार आहे. भारतातील अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत चांगली असून मंदीची लाट आपल्याकडे नाही असे त्या म्हणाल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.