सोलापूर :दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या तक्रारीनुसार दहिटणे येथील समर्थ कारखान्याचे चेअरमन सिद्रामप्पा पाटील, व्हा. चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्यासह तत्कालीन २४ संचालकांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारखान्याने बँकेकडून ६१ कोटी रक्कम कर्ज घेतले होते. त्यासाठी तारण दिलेल्या सारखेची परस्पर विक्री करून ४६ कोटी ३७ लाख रुपये बँकेत न भरता त्या रकमेचा परस्पर अपहार करून बँकेचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मार्च २०१५ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे जिल्हा बँक इन्स्पेक्टर लक्ष्मीपुत्र हौदे यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याने सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत आपल्याकडील ६१ कोटी रुपयांच्या उपलब्ध साखर साठ्यातून कर्जाची मागणी केली. हे कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, त्यानंतर कारखान्याने स्वतःचा फायदा व्हावा या हेतूने साखर कारखान्यातील साखर साठ्याचा तारणमाल बँकेच्या पश्चात परस्पर विकला. याप्रकरणी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक शिवशरण हनमंतप्पा बिराजदार (रा. मैंदर्गी), सुरेश भिमशा गड्डी, (रा. शेगाव), बसलिंगप्पा शिवशरण खेडगी (रा. अक्कलकोट), स्वामीराव रावसाहेब पाटील (रा. कुरनूर) आदी २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बागवे तपास करीत आहेत.