हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
बनकटी (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा ऊसच आता शेतकऱ्यांसाठी डोके दुखी बनला आहे. कारण, ऊस साखर कारखान्याला देऊन अडची अडीच महिने झाले तरी, त्याचे पैसे खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठीही कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मुळात उत्तर प्रदेश सरकारने ऊस दिल्यानंतर कायद्यानुसार १४ दिवसांत त्याचे पैसे मिळतील, अशी ग्वाही दिली होती. जर, पैसे मिळाले नाहीत, तर कायद्यातील तरतुदीनुसारच त्याचे व्याजही मिळेल, असे आश्वासन दिले होते. पण, हे आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. कारण, अडीच महिन्यांनंतर व्याज सोडाच शेतकऱ्यांना कारखान्यांकडून उसाचे पैसेही मिळालेले नाहीत. या संदर्भात शेतकरी राममुर्ती चौधरी म्हणाला, ‘कारखान्याने नोव्हेंबर महिन्यात माझा ऊस वजन करून घेतला होता. त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. माझ्या सुनेवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. त्यासाठी थोडे पैसे लागणार आहेत. पण, उसाचे बिल न मिळाल्याने आता उसनवारी करण्याशिवाय पर्याय नाही.’ दोन महिन्यांपूर्वी रुधौली साखर कारखान्याने ऊस वजन करून घेतला होता. त्याचे पैसे अजूनही मिळालेन नसल्याचे शेतकरी हमीदुल्ला याने सांगितले.
पंचक्रोशीतील आणखी एक शेतकरी सदानंद मिश्रा यांच्या मुलेच लग्न आहे. त्यांच्यासाठी ऊस हाच आधार आहे. डिसेंबर महिन्यात साखर कारखान्याने ऊस घेतला पण, अजून पैसे दिले नाहीत. आता मुलीच्या लग्नासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागणार आहे. जवळपास प्रत्येक शेतकरी अशा आर्थिक पेचात सापडला आहे. रुधौली साखर कारखान्याचे व्यवस्थापक उमेश शुक्ला यांनी ५ डिसेंबरपर्यंत ज्यांचा ऊस कारखान्याने घेतला होता. त्यांचे पैसे देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे सांगितले. कारखाना जस जशी साखर विक्री करेल, असे शेतकऱ्यांचे पैसे भागवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp