रियो ग्रांडे डो सुल : ब्राझीलची बायोएनर्जी फर्म सीबी बायोएनर्जीया (CB Bioenergia) रियो ग्रांदे दो सुलमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी एकूण ७५ मिलियन BRL (USD १४.७m/EUR १४.८m) ची गुंतवणूक करणार आहे. रियो ग्रांदे दो सुल (Rio Grande do Sul) राज्य सरकारचे अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, या नव्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता १० मिलियन लिटरची (२.६m gallons) असेल आणि २०२३ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत हा प्लांट सुरू करण्याचे प्रयत्न असतील. देशातील बहुतांश कारखान्यांपेक्षा वेगळे CB Bioenergia कडून कच्च्या मालाच्या रुपात ऊसाऐवजी गहू, ट्रिटिकल आणि मक्क्याचा वापर केला जाईल. नव्या कारखान्यामध्ये उत्पादित इथेनॉलचा पुरवठा कृषी विपणन बाजार आणि इंधन वितरकांना केला जाईल. ते या जैव इंधनाचे मिश्रण गॅसोलीनसोबत करतील.
सद्यस्थितीत रियो ग्रांडे डो सुल राज्यात इथेनॉलचे उत्पादन १ टक्का होते. मात्र राज्य सरकारने या दशकाच्या अखेरपर्यंत स्थानिक स्तरावरील उत्पादनातून राज्याची ५० टक्के मागणी पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.