सीबीडीटी ने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 32.07 लाख करदात्यांना 1,11,372 कोटींचा परतावा दिला

नवी दिल्ली: केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने एक एप्रिल 2020 ते 22 सप्टेंबर 2020 दरम्यान 32.07 लाख करदात्यांना 1,11,372 करोड रुपयांपेक्षा अधिक परतावा जाहीर केला आहे. आयकर विभागाने सांगितले की, 30,29,681 केसमध्ये 31,856 करोड रुपयांचा आयकर रिफंड जारी करण्यात आला आहे. तर 1,76,966 केसमध्ये 79,517 करोड रुपयांचा कॉरपोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here