नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने गुरुवारी, एक एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत १.१९ कोटींहून अधिक करदात्यांना १,३२,३८१ कोटी रुपयांहून अधिक कर परतावा दिल्याचे जाहीर केले आहे.
याबाबत आयटी विभागाने सांगतिले की, यापैकी १,१७,३२,०७९ प्रकरणात ४४,२०७ कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला आहे. तर १,९९,४८१ प्रकरणांमध्ये ८८,१७४ कोटी रुपयांचा कार्पोरेट टॅक्सचा परतावा दिला आहे. यामध्ये २०२१-२२ यामधील ८३.२८ लाख रिफंडचा समावेश आहे. याची एकूण रक्कम १७,२६६.४८ कोटी रुपये आहे